Wednesday, 1 July 2015

हप्ता

गुन्हेगारांनो,खुशाल गुन्हे करा
आमच्याकडे कमी आहे वेळ
तुमच्याकडे दिले सारे लक्ष तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||०||

दाण्यात खडे की खड्यात दाणे
एवढे भरघोस पीक आपले
कुणा-कुणावर लक्ष ठेवणार
आमचे हे फक्त दोन डोळे...

ज्यांना कुणी गॉडफादर नाहीत
अशांसाठीच फक्त आहेत हो जेल
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||१||

करणारे करतात कायदे कठोर
कशाला उगीच काळजी करता?
दोन नंबरचीच ही लायसन असते
तुमचे भरता अन् आमचेही भरता...

पगारपाणी कमी, पोटाची भूक मोठी
ईमानदारी जावू द्या लावित तेल
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||२||

मेले तर मरु द्यात,माल हवा कडक
वैतागलेल्या बायकांना करु थोडी मदत
रोज पिदोड्याचा मार खाण्यापेक्षा
बरे झाले `गेला´ म्हणतील रडत रडत

सरकार आहेच की पाठीशी त्यांच्या
तुम्ही बिनधास्त करा हो भेसळ
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||३||

आम्ही मारल्यासारखे करतो
तुम्ही रडल्यासारखे करा
टारगेट दाखवण्यापुरतेच तेवढे
आम्हांस सहकार्य करा

जनाची-मनाची म्हणायचंच नाही
सगळीकडे असाच चाललाय हो खेळ
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||४||

*अनिल सा.राऊत*
9890884228

मी नाही त्यातली...

********मी नाही त्यातली******
      

नका आळ घेऊ जाऊबाई

आधी सांगा का एवढी घाई ?
तुमचे झाकते,माझेही झाका
मी नाही हो त्यातली बाई....||०||

`सदना´चं मी काही बोलणार नाही

पुन्हा कधी `चिक्की´खाणार नाही
अळीमिळी गपचिळी मजेत राहू
बोभाट्याने ओरडतील सासूबाई...
तुमचे झाकते,माझेही झाका
मी नाही हो त्यातली बाई....||१||

कुणी मारला डोळा,कुणी `डल्ला´

तुम्हालाच झाली होती किती घाई ?
सारेच कशाला उघडून सांगु लोका
माकडाच्या हाती उगीच कोलीत जाई...
तुमचे झाकते,माझेही झाका
मी नाही हो त्यातली बाई....||२||

शेजारणीची बघा किती आहे `पदवी´

आपले झाकून दुस-याचे वाकून पाही
उणीदुणी तिची काढू आपण मिळून
वळवू विषय मग कसली चिंता नाही...
तुमचे झाकते,माझेही झाका
मी नाही हो त्यातली बाई....||३||

तुमचे तोंड तिकडे ,माझे इकडे

यातच बघा असा `घोटाळा´ होई
मलई खावू दोघी वाटून वाटून 
अन् उडवून लावू तोंडाळ सासुबाई...
तुमचे झाकते,माझेही झाका
मी नाही हो त्यातली बाई....||४||

*अनिल सा.राऊत

9890884228

Tuesday, 30 June 2015

हुजरेगिरी

कडवट घोट 

*शासकीय `मदत' ही पावसा च्या पाण्यासारखी वरुन तर धो धो येते पण विहीरीत मात्र `झिरपत झिरपत' येते....

याउलट,
राजकीय `हुजरेगिरी' ही नदीच्या पाण्यासारखी वरुन थेंबा थेंबाने येते आणि कार्यकर्त्यांत तिचा `समुद्र' होतो....

*अनिल सा.राऊत.
9890884228

visit me:-http://shabdakalyanchagandh.blogspot.com/

भक्ती

💊 कडवट घोट 💉

*देवाच्या भक्तीत मिळते काय
उपास तापास अन हालच हाल....

नेत्यांची भक्ती करुन बघा
होऊन जाल मालामाल🏧

💊💊💊💊💊💊💊💊💊
*अनिल सा.राऊत.
9890884228
💉💉💉💉💉💉💉💉💉